देवपूजा


पूजा कां, कोठें व कशी करावी ? 


देवता ही एक श्रेष्ठ शक्ती आहे. सहवास व नित्य सानिध्य ह्यांमुळे व्यवहारांत जशा अनेक गोष्टी साध्य होतात, तशीच गोष्ट देवपूजेची आहे. इष्ट देवतेच्या नित्य सहवासानें व पूजनानें देवाविषयीं आदर व आपलेपणा वाढतो, देव माझा व मी त्याचा असा प्रेमांकुर वाढतो, म्हणूनच देवपूजा करावयाची श्रेष्ठ शक्तीशी सहवास, हालचाल व व्यवहार करावयाचा असतो.  सुख, समाधान, समृद्धी, व शांति मिळण्यासाठी देवपूजा हा एक प्रत्येकाने करावयाचा विधी (कृति-कर्म) आहे. त्यासाठी काही साहित्य हवे, तसे स्थान म्हणजे जागाही हवी.    


देवघर     

देवांची पूजा करण्याच्या ठिकाणाला ‘देवघर’ म्हणतात. येथे संध्या-वंदनादी विधि व देवपूजा हें एवढेंच कर्म करावयाचें असतें. देवघर विस्तृत मोकळे म्हणजे इतर कोणतीच अडगळ नसलेलें हवे, चांगली हवा व उजेड असलेलें असावें. तें व त्यांतील साहित्य अगदीं स्वच्छ असून ते असें ठेवलेलें असावें की, देवघर पहतांच मनाला आनंदा व्हावा व प्रसन्नता वाटावी. त्यांतील जमीन फरशीपेक्षां मातीची असणें अधिक चांगलें. कारण मंत्रांतील शब्दांचे स्पंदन-प्रतिवाहित्व सर्वांत जास्त चांगले मातींत असतें. पण फरशीमध्यें प्रतीरोधकत्वच जास्त असतें. त्याच्या आजूबाजूलाही गडबड किंवा आरडाओरड होईल असें कांहीं नसावे. देवपूजेच्या वेळीं तरी शांतता असावी. देवघर म्हणजे दिव्य शक्ती उत्पन्न करण्याचें स्थान - ‘पॉवरहोऊस’ आहे. स्वतःच्या घरांत तें ईशान्य भागांत असावें.  


साहित्य 

देवांसाठी लाकडी देव्हारा (चंदन किंवा शिसवीच्या लांकडाचा शोभिवंत आकाराचा देव्हारा ) वा चौरंग असावा. पूजा करण्यासाठीं बसावयास शक्य तर एकसंध फळीचा - चंदन वा आंबा, फणस यांच्या झाडाचा - झाड हा लाकडांतील ‘ब्राम्हण जातीचा भाग’ - असावा. त्यावर दर्भासन - उर्णासन (लोकारीचें) असावें. 

दिवा म्हणजे समई किवा टांगता विजेचा सौम्य प्रकाशी (निळसर वा हिरवा) दिवा असावा.  हें मुख्य स्थाई साहित्य नेहमीं स्वच्छ ठेवावें. देव ठेवण्याचा चौरंग पूजकाच्या आसनापेक्षां उंच असावा. (सन्मान दर्शक ) पाट न घेतां केवळ आसनही चालेल.


टिप्पणियाँ

Populars